विदर्भ बंद ची हाक – शेकडो कार्यकर्ते ताब्यात

नागपूर :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी करता विदर्भ राज्य आंदोलन समिति च्या आंदोलनादरम्यान बुधवारी सकाळी पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सीताबर्डी, व्हेरायटी चौक, विदर्भ चंडिका, शाहिद चौक, लक्ष्मी भवन चौक, गोकुळ पेठेतील लालबहादूर शास्त्री पुतळा आणि मानेवाडा रोडवरील तुकडोजी महाराजांचा पुतळ्याजवळ आंदोलने करण्यात आली होती.

 

 

 

 

 

 

 

 

वेगळ्या विदर्भाकरता भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य नेत्यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेचा निषेध आंदोलक करत आहेत. या आंदोलनात अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. अधिवेशन च्या पहिल्या दिवशी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथील सेकड़ो कार्यकर्तेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील व्हेरायटी चौक येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आंदोलन दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अधिक वाचा : राज्यातील सर्वसामान्य माणसांचे भले व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस