ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं सोपवण्याची गरज नाही- केंद्राचा निर्णय

Date:

वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्राफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

अधिक वाचा : नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Amazon is Committed to Boost the Growth of Local Shops Sellers in Maharashtra, During the Festive Season

Amazon is dedicated to enhancing the growth of local...

Wockhardt Hospitals Powers Up Patient Safety Week 2024

Mumbai - Wockhardt Hospitals Ltd., a reputed chain of...