नागपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Date:

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन शनिवारी (ता.२) उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालयातील हिरवळीवर असलेल्या प्रथम महापौर बॅरी. शेषराव वानखेडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर प्रवीण दटके, जलप्रदाय समिती विजय झलके, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, गलिच्छ वस्ती सुधार समितीचे सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका रूपा रॉय, मंगला गवरे, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, महेंद्र धनविजय, भगवान मेंढे, राजेंद्र सोनकुसरे, संजय महाजन, दिपक चौधरी, संदीप गवई, किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता उल्हास दाबेडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, निगम सचिव हरीश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त राजु भिवगडे, सुभाष जयदेव यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

दोन मार्च १९५१ रोजी नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज नागपूर महानगरपालिकेला ६८ वर्ष झाली. ६८वा वर्धापन दिन उत्साहात मनपा मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

अधिक वाचा : नागपूर महानगरपालिकेच्‍या सी.एन.जी. बस सेवेचा गडकरींच्‍या हस्‍ते शुभारंभ

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...