भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्या करिता नागपूर सुसज्ज -असा असणार बंदोबस्त

Nagpur

नागपूर: वाहतूक नियमन सुलभ व्हावे व वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये व वाहन चालकांची गैरसोय टालण्याकरिता पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्हि.सी.ए. क्रिकेट स्टेडियम जामठा नागपूर येथे दि.०५/०३/२०१९ रोजी १३.०० या पासुन विदर्भ क्रिकेट असोसिएशन याचे द्वारे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.दिवस रात्र एकदिवसीय क्रिकेट सामना बघण्याकरिता संपूर्ण देशातून जवलपास 50,000 क्रिकेट रसिक आपले वाहनाने वर्धारोडने तसेच नागपूर शहर मार्गे जामठा क्रिकेट स्टेडियम येथे येणार आहेत. वर्धा रोडवर वाहतूकीची कोंडी होवून अपघात प्रवण परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे ज्वाईंट पोलिस कमिशनर रविंद्र कदम यांनी पत्रपरिषद मध्ये बोलताना सांगितले.

क्रिकेट मैच करिता वाहतूक कोंडी होऊ नये त्याकरिता खालील प्रमाणे पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्लेयर्स ला हॉस्पिटल ला नेण्यासाठी राहणार. दुसरी लेन सुरू राहणार.जो पहिले येईल तो गेट नं.१ वर जाणार. जामठा नं.१ गेटवर लेफ्ट ला 2 व्हीलर राईट ला 4 व्हीलर ग्रीन स्टीकर असलेले वाहन वर्धा रोड जामठा टी पाँईट येथून स्टेडियम गेट नं.5 पर्यंत येथून समोरील व्हि.व्हि.आय.पी. पार्किंग मध्ये वाहने पार्क करतील.व्हाईट स्टीकर हे V C A चे मेंबर्स असतील. स्टेडियमच्या कमी जागेत 3000ची पार्किंग जागा 2व्हीलर 4 व्हीलर 3000 ईतकी  पार्किंगची जागा राहणार आहे. 45 डिग्री मध्ये गाडी लावावी. बाहेर दोन ग्राऊंड,शारिरिक शिक्षण,मैदान पार्किंग मध्ये गाड्या लावणार. शारिरिक शिक्षण माउँट रोड,वर्धा,चंद्र पूर कडून जे येणार ते शारिरिक शिक्षणमथ्थे गाड्या लावणार.ही आत मध्ये येण्याची पद्धति राहणार आहे.

२) प्रेक्षकांचे मैच सुटल्यानंतर रस्ता जाम होणार नाहीं. याची येथे विशेष कालजी घेण्यात आली आहे.व कमीत-कमी वेळ मध्ये लोकं घरी जाणार. त्याकरिता त्यांनी विशेष दस्ता तैयार केला आहे.

वाहतूक शाखा-5 पोलिस उपायुक्त 7 ए.सी.पी.इंन्सपेक्टर,92 इंन्सपेक्टर,1012 पोलिस, व  140 महिला पोलिसांची नियुक्ति वाहतूक बंदोबस्त करिता केली आहे. 2पथके एकूण बंदोबस्त मैच सुचारू संचालणासाठी लावले. ऑनलाइन टिकट बुकींग जास्त झाल्याने गर्दी जास्त वाढण्याची शक्यता दर्शविली आहे. विशेष म्हणजे वाहतूक बंदोबस्ताला पोलिस कमिशनर डॉ.भूषणकुमार उपाध्याय उपस्थित राहतील.

जामठा स्टेडियम समोर नागरीकांचे मदतीकरिता पोलिस नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेले आहे. तसेच जामठा स्टेडियम नियंत्रण कक्षाजवल व जामठा टी पॉईंट येथे चौकशी/हेल्पलाइन कक्ष उभारण्यात आलेली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे ज्वाईन्ट कमिशनर रविंद्र कदम यांनी सांगितले.

Comments

comments