नागपूर – १३६ ​ठिकाणी WiFi Hot spot

Date:

नागपूर : नागपूर स्मार्ट अॅंन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरात १३६ ठिकाणी वाफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यात आले आहे. तर, १५६ ठिकाणी पब्लिक अनाऊंन्समेंट सिस्टमही लावण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकल्पांतर्गत बहुतांश काम झाले असून, संपूर्ण प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले असल्याचा दावा स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापनाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून, २०१५ मध्ये स्मार्ट सिटीची घोषणा केली. नागपूर शहराचा दुसऱ्या टप्प्यात या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. मंगळवारला या प्रकल्पाला चार वर्ष पूर्ण झाले. या प्रकल्पाचा ५२० कोटीचा खर्च आहे. लार्सन अॅंड टुब्रो या कंपनीकडे हे काम आहे.

राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान, नागपूर पोलिस आयुक्तालय व नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोंरेशन लिमिटेड यांच्यातर्फे हा नागपूर सेफ अॅंड सेफ सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत १०४५ किमी लांबीचे ऑप्टीकल फायबरचे नेटवर्क टाकण्यात आले. शहरातील ७०० जंक्शनवर ३३५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. ४९ ठिकाणी विविध मेसेज साईनबोर्ड(वॅम्स)उभारण्यात आले. यासोबतच शहरातील १० ठिकाणी पर्यावरणसूचक सेंन्सर्स बसविण्यात आले. मनपा मुख्यालयात सिटी ऑपरेशन केंद्र तयार करण्यात आले. नागपूर पोलिस आयुक्तालयासाठीचे कमांड अॅंड कंट्रोल सेंटरचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस विभागाला मदत प्राप्त होईल. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टमची मदत होईल. मनपात उभारण्यात आलेल्या सिटी ऑपरेशन केंद्रामुळे नागरी सुविधा जलद गतीने पुरविता येणे शक्य होईल. एवढेच काय तर गतीमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल असा दावा करण्यात येत आहे. यासोबतच ५ मोबाईल सर्व्हिलंन्स वाहन व ५ ड्रोन, २० आसीटी आधारीत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्मार्ट बिन, १० चौकांवर स्मार्ट ट्रॉफिक सिस्टीम, ६७ कारसाठी स्मार्ट पार्किंग, स्मार्ट बस परिवहन वाहतूक आणि २६ पोलिस स्थानकावर निगराणी सेंटरचा यात समावेश आहे.

– ६५० कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी येथील क्षेत्राधिष्ठीत विकासासाठी ६५० कोटीचा प्रकल्प आहे. यात रस्ते, पुल, मोऱ्या, विद्युतीकरण, मलनि:स्सारण संबंधीत कामे करण्यात येत आहे. यात ५२ किलोमीटरचे स्मार्ट रस्ते, २९ पुलांचा समावेश आहे. त्यासोबतच पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व्यवस्था, एलईडी पथदिवे, सायकल ट्रक, पदपथ आदींचा समावेश आहे. १८ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. या प्रकल्पांमुळे आयुष्याची गुणवत्ता व सुरक्षा सुधारेल, वर्धित वाहन मार्ग, रस्त्याचे चिन्ह, छेदनबिंदूसह सुधारीत रोड नेटवर्क पादचारीच्या सुरक्षेकरीता क्रॉसिंग सुविधा उपलब्ध होईल. दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळेल. सायकलट्रॅक व पदपथासह वहतूक व्यवस्था, रोजगाराच्या संधी, प्रवास वेळेत महत्वपूर्ण बचत आणि वाहन ऑपरेशन खर्चामध्ये घट, सतत पाणीपुरवठा, कार्यक्षम घन कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छतेत सुधारणा आदींचा १ लाख १३ हजार लोकसंख्येला याचा थेट फायदा मिळेल.

चौकट..

१०२४ स्वीट होम दीड वर्षात

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प (होम स्वीट होम)अंतर्गत भरतवाडा व पुनापूर येथील तीन वेगवेगळया जमिनीवर प्रकल्पग्रस्त व्यक्तींसाठी १०२४ घरांचे दीड वर्षात बांधकाम होणार आहे. या प्रकल्पात प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन करून उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे वेगवान बांधकाम, उच्च भूकंप प्रतिरोधक, दर्जेदार व दीर्घकाळ टिकाऊ हरीत इमारती, कमी देखभाल व खर्चातही बचत होईल. शांती कंन्स्ट्रक्शन प्रा.लिमिटेड जामनगर या प्रकल्पाचे कंत्राटदार व ग्रंट थॅार्नटन इंडिया एलएलपीकडे या प्रकल्पाचे व्यवस्थापन आहे. या प्रकल्पामुळे एकसंध क्रॉंक्रिट बिल्डींग, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याची साठवणूक होईल,हरीत इमारत संकल्पना, मल:निस्सारण प्रक्रिया केंद्र, व्यावसायीक केंद्र, व्यावसायीक दुकाने, उद्यान, लिफ्ट, मुलांना खेळण्याची जागा, जॉगींग ट्रॅक, पार्किंग सुविधा, बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्ट आदी खेळविषयक सुविधा पुरविले जाणार आहे. शिवाय,मुख्य प्रवेशद्वारावर केबीनसह सुरक्षा रक्षकाची तैनाती राहणार आहे.

अधिक वाचा : नागपूरात प्लॉटची परस्पर विक्री

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...