बंद सिग्नलच्या खांबावर टाकले हार

नागपूरउत्तर नागपुरातील श्री संत गोरोबा कुंभार, वीटभट्टी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक सिग्नलचा बंद खांब आहे...

नागपूर

नागपूर: उत्तर नागपुरातील श्री संत गोरोबा कुंभार, वीटभट्टी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक सिग्नलचा बंद खांब आहे. या चौकात अनेकदा अपघात होतात. याबाबत अनेक ठिकाणी तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर परिसरातील सर्वसमान्य नागरिकांनी बंद खांबावरच हार घालत गांधीगिरी केली.

उत्तर नागपूर युवक कॉंग्रेसचे महासचिव शेख शाहनवाज यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. बंद सिग्नलमुळे या चौकात अनेकदा अपघात झाले. गंभीर अपघातही झालेत. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकारचे आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ५ या भागात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग होता. आंदोलनात रामाजी उईके, प्रमोद शाहू, भोलाराम शाहू, भूषण हिरवानी, शेखर यादव, धीरज निकोसे यांच्यासह इतरांनीही आंदोलनात भाग घेतला.