छोटे कुटुंब असणं ही देखील देशभक्तीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi

नागपूर: छोटे कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे. ज्या लोकांची कुटुंबं छोटी आहेत त्यांचा सन्मान करायला हवा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात आज व्यक्त केलं. लोकसंख्येची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

७३ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणण्याची गरज आहे. भारतात लोकसंख्येची वेगानं होणारी वाढ येणाऱ्या पिढ्यांसाठी अडचणी निर्माण करते आहे. या देशातील एका वर्गाला या समस्येची जाणीवही आहे. त्यामुळं मुलं जन्माला घालण्याआधी ते सारासार विचार करतात. सर्वांनीच यावर गांभीर्यानं विचार करावा, असं आवाहन मोदींनी केलं.

‘भ्रष्टाचार ,वशिलेबाजी या गोष्टी कमी व्हायलाच हव्यात यात दुमत नाही. मात्र, स्वयंप्रेरणेनं लोक कुटुंब नियोजन करत असतील तर ते स्वत:बरोबर देशाचंही भलं करत असतात. ती देखील एक प्रकारची देशभक्तीच आहे,’ असं ते म्हणाले.