क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी नागपूरकरांची ‘वाकॉथॉन’

मनपा-टाटा ट्रस्ट-रोटरीचा पुढाकार : मतदानाचेही केले आवाहन

नागपूर

नागपूर : ‘टी.बी. हारेगा, देश जितेगा’, ‘आओ मिलकर करे निश्चय, भारत को बनाये नि:क्षय‘, ‘ग्रीन नागपूर, टी.बी. फ्री नागपूर’ अशा घोषणादेत नागपूरकरांनी रविवारी (ता. २४) वॉकॉथॉनच्या माध्यमातून क्षयरोगविषयी जनजागृती केली.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने नागपूर महानगरपालिका, टाटा ट्रस्ट, रोटरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य मिशन, इंडियनमेडिकल असोशिएशन यांच्या सहकार्याने पोलिस जिमखानाजवळील वॉकर स्ट्रीट येथून सकाळी ६ वाजता वॉकॉथॉनचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शहर क्षयरोग अधिकारी तथा उपसंचालक(आरोग्य) मनपा डॉ. के. बी. तुमाने, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटाट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. राधा मुंजे, रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. के. एस. राजन, आयएमएचेअध्यक्ष डॉ. आशीष दिसावल, एम्सचे डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. दत्ता, डॉ. नरेंद्र बहीरवार, डॉ. दीपांकर भिवगडे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोककोल्हटकर सहभागी झाले होते.

वॉकॉथॉनच्या शुभारंभप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, सन २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार करायचे आहे. यासाठीनागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. हीच जबाबदारी टाटा ट्रस्ट, रोटरीसारख्या संस्थाच्या मदतीने मनपाने उचलली आहे. पुढीलकाही वर्षांत नागपूर क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी यावेळी क्षयरोगमुक्त नागपूर अभियानात सर्व नागपूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मनपाचेआरोग्य उपसंचालक डॉ. के.बी. तुमाने यांनी क्षयरोगमुक्त नागपूर अभियानात नागपूर महानगरपालिकेच्या भूमिकेबाबत सांगितले. अन्य मान्यवरांनीहीयावेळी मार्गदर्शन केले. क्षयरोगमुक्त नागपूर करण्यासंदर्भात यावेळी वॉकॉथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी शपथ घेतली. यानंतर मनपाचेअतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी झेंडी दाखवून वॉकॉथॉनचा प्रारंभ केला. वॉकर स्ट्रीट, लेडीज क्लब, लॉ कॉलेज चौक, जीपीओ चौक असे मार्गक्रमणकरीत वॉकॉथॉनमध्ये सहभागी झालेले नागरिक वॉकर स्ट्रीट येथे पोहोचले. तेथे समारोप झाला. संचालन रोटरीचे मंगेश जोशी यांनी केले. आभार डॉ.टिकेश बिसेन यांनी मानले. वॉकॉथॉनमध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, मातृसेवा संघ नर्सिंग स्कूलमधील प्रशिक्षणार्थी परिचारिका, रोटरीआणि आयएमएचे सदस्य, मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मतदान करण्याचे आवाहन

वॉकॉथॉनच्या शुभारंभ कार्यक्रमात मान्यवरांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणूक हा राष्ट्रीयकार्यक्रम असून मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. सुशासन निवडण्यासाठी आपले मत आवश्यक आहे. निवडणुकीचा दिवस हा सुटीचादिवस न समजता आपली जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून मतदान करा आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

अधिक वाचा : जागनाथ रोड मर्चेंट एसोसिएशन ने मनाया होली मीलन

Comments

comments