नागपूर – संततधारेने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी

Date:

नागपूर : गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या संततधारमुळे शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या असून, काहींमध्ये पाणी घुसले आहे. विशेषत: शहराच्या बाह्यभागातील वस्त्यांमध्ये व रस्त्यांवर तलावाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास शहरावर संकट येऊ शकते. शहरात विकासाच्या नावावर करण्यात आलेल्या रस्ते व स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक भागांना फटका बसत आहे. अतिवृष्टी झाल्यास या विकासाचीही पोलखोल होईल. तूर्तास यावर उपचार म्हणून मनपानेही तयारी चालविली आहे. अनेक ठिकाणी झाडे वाकली असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे.

शहरात सोमवारपासूनच संततधार सुरू आहे. रात्री काही तास चांगला पाऊस झाला. तर, मंगळवारी सकाळपासूनच संततधार सुरू आहे. यामुळे शहराच्या बाह्यभागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. ते वस्त्यांपर्यंत शिरले. कळमना भागातील नेताजीनगर, पुनापूर, भरतवाडा, पारडी रोड आदी भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. उत्तर नागपुरातील यशोधरानगर, विनोबा भावेनगर, कामगार कॉलनी, कुशीनगर, नारी, नारा, कस्तुरबानगर आदी भागांतील वस्त्याही जलमय झाल्या होत्या. मध्यनागपुरातील डोबीनगर, खदान आदी परिसरात पाणी साचले होते. पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान, बोरगाव, पलोटी शाळेच्या मागील परिसर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर भागातील नाल्याशेजारील वस्त्या, पांढराबोडी, सरायकरनगर या भागातही पाणी शिरले होते. दक्षिण पश्चिममधील सोनेगाव परिसर, टाकळीसीम, जयताळा, भामटी यासह इतरही भागात पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या. दक्षिण नागपुरातील चंद्रमणीनगर, चिंचमलातपुरेनगर, ओंकारनगर, टोळी, बजरंगनगर, जंबुदीपनगर, महालक्ष्मीनगर, अंबिकानगर आदी भागांमध्येही असाच संततधार पाऊस आल्यास पाणी शिरण्याची शक्यता बळावली आहे. याच मतदारसंघातील मोठा ताजबाग, गौसीया कॉलनी, बिडीपेठ, भांडे प्लॉट आदी परिसरातही पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नागरिक सतर्क झाले आहे. यासोबतच पूर्व नागपुरातील वाठोडा, दिघोरी परिसरातही संपूर्ण परिसर पाणीमय झाला आहे. भांडेवाडी व परिसरातील वस्त्यांमध्ये दूरवर नजर टाकल्यावर सर्वत्र पाणीच पाणी दिसते. पूर्व नागपुरात स्मार्ट सिटीमुळे सुरू असलेल्या कामांमुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरत आहे. शहरातही सिमेंट रस्त्यांच्या सदोष कामांमुळे वस्त्यांमध्येही पाणी शिरत असल्याचे चित्र होते

लाकडीपूल भागात मोठे झाड वाकले

प्रभाग क्र. २२ मधील लाकडीपूल पोलिस चौकीजवळील अध्ययन कक्षाजवळ असलेले एक मोठे झाड वाकले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगोले यांनी तातडीने मनपाच्या

अ​ग्निशमन दलाला सूचना केली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने पोहोचले. पोलिसांनाही माहिती दिल्यानंतर पथक पोहोचले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक रोखून धरत झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. दरम्यान, शहरातील अनेक मुख्य मार्गाशेजारी असलेल्या झाडांच्या फांद्याही पाऊस व वाऱ्याने वाकलेल्या आहेत. पाऊस सुरू असताना वाहन चालविताना वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो.

अधिक वाचा : नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...