नागपूरच्या विद्यार्थ्याची दिल्ली रेल्वेस्थानकावर आत्महत्या

Date:

नागपूर : उपराजधानीतील राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अठरावर्षीय विद्यार्थ्याने दिल्ली रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

नल्ली हेमंत कुमार (मूळ रा. विशाखापट्टणम) असे मृतकाचे नाव आहे. तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. तो प्रथम वर्षाला शिकत होता. ३० नोव्हेंबरला नल्ली वसतिगृहातून बेपत्ता झाला. १ डिसेंबरला वसतिगृह प्रशासनाने मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. २ डिसेंबरला दिल्ली रेल्वेस्थानकावर एका युवकाचा कटलेला मृतदेह आढळला. त्याच्या पॅन्टच्या खिश्यात कॉलेजचे ओळखपत्र व नागपूर-दिल्लीचे रेल्वे तिकीट होते. त्यावरून दिल्ली लोहमार्ग पोलिसांनी त्याची ओळख पटवली. नागपूर पोलिसांना माहिती दिली.

आत्महत्येपूर्वी त्याने मित्र व नातेवाइकांनी लिहिलेली चिठ्ठी व्हॉट्सअॅप केली आहे. दबावामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे. चिठ्ठी तेलुगू भाषेत असल्याने त्याने नेमके काय लिहिले, याचा तपास पोलिस करीत आहेत.

अधिक वाचा : मेट्रोच्या ट्रेलरने कामगारांना चिरडले

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related