नागपूर : (Nagpur)आईला मारहाण करणार्‍या बापाची मुलाने केली हत्या

Nagpur

नागपूर : शिवीगाळ करून आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलाने भिंतीवर डोके आपटून खून केला. ही थरारक घटना (Nagpur) सावनेरमधील सदभावनानगर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीत घडली. घनश्याम चुन्नीलाल तिलेकर (वय ४७), असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलाला (आरोपी) पोलीसांनी अटक केली आहे असून, त्याने नुकतीच १२ वी ची परिक्षा दिली आहे.

घनश्याम हे वकोलित कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दारू पिऊन नेहमी ते पत्नी बिनिता व मुलांना शिवीगाळ करून मारहाण करायचे. दोन दिवसांपुर्वी त्यांनी पत्नीला मारहाण केली. देवघराची तोडफोड केली. त्यामुळे संतप्त मुलाने बापाला (घनश्याम) काठीने मारहाण केली होती. त्यांनंतर त्यांचे डोके पकडून त्यांना भिंतीवर आपटले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर घनश्याम यांना रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, सावनेर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपी मुलाला अटक केली. त्याला २३ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कुंदन याने नुकतीच बारावीची परीक्षा दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.