नागपूर : पदाचा गैरवापर करून मिळकतीपेक्षा नऊ लाखांपेक्षा अधिकची ‘माया’ जमविणाऱ्या सावनेर पंचायत समितीचे ग्रामसेवक रमेश पुंडलिकराव बन्नगरे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.
बन्नगरे यांनी १९८६ ते २०१३ या कालावधीत भ्रष्टाचार करून अपसंपदा जमविल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा कार्यालयामार्फत बन्नगरे यांची चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान या कालावधीत बन्नगरे यांनी मिळकतीपेक्षा ४१.८९ टक्के अधिक अर्थात नऊ लाख १९ हजार ५४६ रुपयांची मालमत्ता जमविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बन्नगरे यांच्याविरुद्ध कारंजा घाडगे पोलिस स्टेशनमध्ये अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन विखे, निरीक्षक सुहास चौधरी, शिपाई रोशन निंबाळकर, प्रशांत वैद्य, सागर भोसले, प्रदीप कुचनकर, अर्पणा गिरजापुरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आधीक वाचा : नागपूर : विदर्भातील ‘कुणबीं’ना आरक्षणात घ्या