नागपुरात तीन कैद्यांची प्रतिस्पर्धी कैद्याला मारहाण, भांड्यापासून तयार केले धारदार शस्त्र

Date:

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांनी प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने कैदी रोशन शेखवर वार करण्यात आले. हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात रविवारी तिघा कैद्यांनी रोशन कयूम शेख या प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. रोशन मकोको कायद्या अंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून कारागृहात बंद आहे. रोशन कारागृहातही गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाल्याचे बोलले जाते.

शिवीगाळ केल्याने तिघांकडून हल्ला                                                                                            रविवारी सकाळी रोशन आंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या काही कैद्यांना त्याने शिवीगाळ केली. यावरुन संतप्त झालेल्या तिघांनी रोशनवर हल्ला केला. रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

रोशन रुग्णालयात दाखल, तिघांवर गुन्हा                                                                                    रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षारक्षक धावून गेले. त्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडाऱ्यात कैद्याची पोलिसाला मारहाण                                                                                        भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने इतर कैद्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती. कैदी कार्तिक बकाराम मेश्रामने कैदी किरण शिवशंकर समरीत याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केली. त्यावेळी कारागृह पोलीस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही धक्का दिला.

या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तिथेही पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होत हाणामारी सुरु झाली. तेव्हा पुन्हा पोलीस कर्मचारी घरत यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मेश्रामने पोलीस कर्मचारी घरत यांचीच कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही, तर जमिनीवरील 5 ते 7 किलो वजनाचा दगड उचलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...