अवस्थी नगर ते पागलखाना चौकादरम्यानची वाहतूक प्रतिबंधित ; सीमेंट रोड बांधकामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुक बंद

Date:

नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील पोलिस लाईन टाकळी फिडर रोड, अवस्थीनगर चौक ते पागलखाना चौकापर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. यासंबंधी आदेश नुकतेच मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पारित केले.

सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये रस्ता क्रमांक ३० पोलिस लाईन टाकळी फिडर रोड, अवस्थीनगर चौक ते पागलखाना चौक दरम्यान ५ जुलैपासून सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे.

त्यामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत या रस्त्यावरील डाव्‍या बाजूची वाहतूक बंद राहील. या मार्गावरील वाहतूक उजव्या बाजुने दुतर्फा केली जाईल व इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे, यासंबंधीही आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

अधिक वाचा : नागपूर : दारूतस्कराला सिनेस्टाइल अटक

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related