Nagpur: मानसिक धक्का बसल्याने , कोरोना पॉझिटिव्ह महिलेने केली आत्महत्या

Date:

नागपूर: वर्धा मार्गावरील एम्स हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या करोना बाधित महिला रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. रेणुका रमेश अलघटे (वय ४५, रा. टाकळघाट), असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका यांची प्रकृती खालावल्याने ३ मे रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पाचव्या माळ्यावरील कोविड केंद्रात उपचार घेत असताना त्यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

विदर्भात १२ हजार ७२४ बाधितांची भर                                                                                      विदर्भात गुरुवारी १२ हजार ७२४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे तर २०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १४ हजार ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नागपूर येथे ४ हजार ९००, भंडारा ५२७, गोंदिया ३९७, गडचिरोली ५६२, चंद्रपूर १ हजार ५०८, वर्धा ९०५, यवतमाळ ९१९, अमरावती १ हजार १८९, अकोला ६८०, बुलडाणा ६४१ तर वाशीममध्ये ४९६ नव्या बाधितांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ८१, वर्धा २३, अमरावती २०, यवतमाळ १६, भंडारा १६, चंद्रपूर १५, अकोला ११, गोंदिया ८, गडचिरोली ६, वाशीम ६, बुलडाणा येथे दोघांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात मृतांच्या संख्येत घट झाली असून पॉझिटिव्ह पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये ६ हजार ९३७ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपासून करोना रुग्णांचा वाढता आलेख घसरणीला आला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५२७ नव्या करोनाबाधितांची भर पडली. तर ७१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४५ हजार २६० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता करोना बाधितांची संख्या ५४ हजार २३२ झाली असून ८ हजार ३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...