ऑक्सिजनअभावी बहिणीचा मृत्यू, मात्र या धक्क्यातून सावरत अनेक रुग्णांसाठी ठरत आहे ‘आरोग्यदूत’

Date:

नागपूर : करोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याने जगभरात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. रक्ताच्या नात्यातील लोकांनी डोळ्यासमोर जीव सोडताना पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत इतरांच्या कुटुंबातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून काहींनी स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिलं. नागपूरमधील बाबा मेंढे हेदेखील अशांपैकीच एक आरोग्यदूत ठरले आहेत.

करोना संक्रमणामुळे ऑक्सिजनअभावी आपल्या बहिणीला वाचवू न शकल्याने बाबा मेंढे यांच्या मनात मोठं शल्य आहे. हे शल्य तर कधीच कमी होणार नाही. मात्र, त्या वेदनेची धार कमी करण्यासाठी मेंढे यांनी गरजूंना स्व:खर्चातून मोफत ऑक्सिजन पुरवण्याचा विडा उचलला आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबा मेंढे यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. करोना संक्रमणाचे निदान उशिरा झाल्याने आणि ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याच्या नादात त्यांच्या बहिणीचा जीव वाचू शकला नाही. त्यांनी मोठ्या संघर्षानंतर ३० ते ३२ हजार रुपये मूळ किंमत असलेले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर ७० हजारांना मिळवले. मात्र, एक दिवस उपयोग होऊन दुसऱ्या दिवशी बहिणीला जीव गमवावा लागला.

बहिणीच्या मृत्यूनंतर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही बाबा मेंढे हे खचले नाहीत. आपल्या बहिणीसारखा त्रास दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते पुन्हा उभे राहिले. त्यांनी स्वत:कडील एक ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि इतरांकडे उपयोग झाल्यानंतर उरलेले ९ कन्सन्ट्रेटर मिळवून ते ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत मोफत पुरवण्याचे काम सुरू केले. याचा लाभ आज अनेक गरजूंना होत आहे. मात्र, दररोज शेकडो फोन येतात. त्या प्रत्येकापर्यंत ते पोहोचवता येत नसल्याची खंत बाबा मेंढे यांना आहे.

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर इलेक्ट्रिसिटीद्वारे चार्ज होते. ते सिलिंडरप्रमाणे रिफिल करावे लागत नाही. ९० ते ९३ या मात्रेत ऑक्सिजनची पातळी असणाऱ्यांचे ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यास हे कन्सन्ट्रेटर उपयोगी पडते.

इतर नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन                                                                                  ‘ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित ठेवण्यासाठी हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर उपयोगी पडते. शहरात बहुतांश लोकांकडे कोरोना संक्रमणात हे कन्सन्ट्रेटर आहेत. त्यांच्याकडील उपयोग झाल्यावर ते तसेच पडून राहणार आहेत. अशा स्थितीत ते रिकामे पडून राहण्यापेक्षा गरजूंना उपयोगी यावेत, यासाठी त्यांनी ते कन्सन्ट्रेटर द्यावेत, जेणेकरून अनेकांचा जीव वाचवता येईल,’ असं आवाहन बाबा मेंढे यांनी शहरातील नागरिकांना केलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...