नागपूर : महाराष्ट्र शासनाचा राजपत्र दि.३० जानेवारी, २०१९ नूसार ७ वा वेतन आयोग राज्यातील सर्व कर्मचा-यांना लागू करण्याचे निर्देश प्राप्त आहे. त्यानुसार माहे फेब्रुवारी पेड इन मार्च २०१९ च्या वेतनात ७ वा वेतन आयोग नूसार शासकिय कर्मचा-यांचे पगारामध्ये सुध्दा लागू करण्यात आले आहे.
परंतू नागपूर महानगरपालिकेच्या अस्थापनेत अजूनपर्यंत लागू करण्यात आले नाही त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचा-यांमध्ये नाराजी असल्याने नाकारता येत नाही.
शासन निर्णय प्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी/कर्मचा-यांना सुध्दा ७ वा वेतन आयोग प्रमाणे माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०१९ च्या वेतनात ७ वा वेतन आयोग नूसार वेतन लागू करण्यासाठी अंदाज पत्रकात तरतुद करण्यासाठी निर्देश देण्याची कृपा करावी अशी मागणी नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांना निवेदन देऊन जूलै पेड इन ऑगस्ट २०१९ च्या वेतनात सातवा आयोग लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात कर्मचारी नेते इजि.कल्पना मेश्राम, अशोक कोल्हटकर, राजेश हाथीबेड,विनोद धनविजय, विशाल शेवारे, संजय बागडे, सूषमा नायडू, राजकुमार वंजारी, राजेश वासनिक, वंदना म्हैसकर, दिलीप तांदळे, प्रमोद बारई, जयंत बंसोड, आरती गोपीलवार, पांडूरंग जगताप यांचेसह बहूसंख्य कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : ICC Defends India-Pakistan Finish As Experts Slam “Farce”