नागपूर : चिमुकलीसमोरच कौटुंबिक कलहातून आईने घेतला गळफास

Suicide in nagpur नागपूर Nagpur

नागपूर : कौटुंबिक कलहातून आईने चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथे शनिवारी उघडकीस आली. रंजिता स्वास्तिक कौरासे (वय ३२),असे मृत मातेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजिता यांचे पती स्वास्तिक हे ‘महानिर्मिती’मध्ये अभियंते आहेत. त्यांना चार वर्षांची मुलगी प्राची आहे. गत काही दिवसांपासून स्वास्तिक व रंजिता यांच्यात वाद सुरू होता. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला. स्वास्तिक हे कामावर गेले. यादरम्यान मुलीसमोर रंजिता यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. प्राचीने रंजिता यांना आई-आई म्हणत आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. प्राची ही रडत-रडत बाहेर आली. शेजारी जमले. काय झाले, हे बघण्यासाठी शेजारी घरात गेले असता रंजिता या गळफास लावलेल्या दिसल्या. शेजाऱ्यांना धक्का बसला.

एका शेजाऱ्याने कोराडी पोलिस व स्वास्तिक यांना माहिती दिली. माहिती मिळताच, कोराडी पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल जगदीश जगनवार ताफ्यासह तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. सचिन सुखदास रायकवार (३३,रा. केटीपीएस कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कौटुंबिक कलहातून रंजिता यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा : Nagpur : ISRO’s Second Launch Attempt For Chandrayaan-2 At 2:43 pm Today