नागपूर : शिक्षक सहकारी बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी दीपक निलावार यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शिक्षक सहकारी बँकेचे थकित कर्जदार मे. रेवती कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स, भागीदार दीपक निलावार, रेखा निलावार, अमित, प्रियंका, सुमित या निलावार कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता गहाण ठेवून बँकेकडून ओव्हर ड्राफ्ट कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड नियमित न केल्याने हे खाते थकित होऊन एनपीए झाले. कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेकडून वारंवार नोटीस पाठविण्यात आली होती.
नोटीस देऊनही कर्जाची रक्कम न भरल्याने बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट २००२ अंतर्गत नोटीस दिली. ६० दिवसांची मुदत पूर्ण होऊनही कर्जाची रक्कम न भरल्याने गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करण्यात आला. यावर सुनावणी होऊन गहाण संपत्तीचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले.
२६ जून रोजी तहसीलदार यांच्या नेतृत्वात पथकाने गहाण संपत्तीचा ताबा घेतला. चोख सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा : नागपूर – उद्यापासून धावणार दर तासाने मेट्रो