नागपूर : गुन्हेगार तडीपार असताना घरफोड्या

Date:

नागपूर : तडीपार असतानाही मोक्कातील आरोपीच्या मदतीने घरफोड्या करणाऱ्या दोन गुन्हेगारांसह चौघांना बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सनी सुरेंद्र चव्हाण (वय २०,रा. वाल्मिकीनगर), प्रशांत सुभाषराव कांबळे (वय २८,रा. बारासिग्नल), स्टीफन रॉबिनसन लाल (वय १९,रा.इंदिरानगर) व सनी राजा तांबे (वय १९, रा. बारासिग्नल),अशी अटकेतील घरफोड्यांची नावे आहेत.

सनीला दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर, प्रशांत कांबळे हा मोक्कातील आरोपी असून सध्या तो जामिनावर आहे. १३ जूनला सप्तगिरीनगर येथील राजदीप देविदास उताने यांच्याकडे घरफोडी झाली.

याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तलवारे, निरीक्षक दिलीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरेंद्र केदारे, हेडकॉन्स्टेबल अविनाश ठाकरे, शिपाई विजय श्रीवास, गोपाल देशमुख, मिलिंद पटले, रितेश ढेंगे, प्रशांत सोनुलकर, नितीन बावणे, कुणाल लांडगे, दिनेश खेडकर, कमलेश गणेर, सुखदेव वटाने, निश्चय बढिये, दीपक तऱ्हेकर, राहुल धोटे यांनी गुप्त माहितीच्या आधारे आधी प्रशांतला व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोटरसायकल, चाकू व अन्य साहित्य जप्त केले.

अधिक वाचा : जलसंकट पर जमकर हुआ बवाल, महापौर पर फेंके पर्चे

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related