नागपूर : महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग

नागपूर : येथील महाकाली नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. झोपडपट्टीमधील अनेक झोपड्या या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत. ही घटना समजताच अग्नीशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गॅस सिलिंडरचा स्फोटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने, खूपवेळा मोठा आवाज झाला आणि आग जास्त वाढल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत मोठे नुकसान  झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.