पुणे : पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत फुटल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचे चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचले आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे.
पाणी खूप मोठय़ा प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणे थांबवले आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दांडेकर पूल परिसरात बैठी घरे आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले आहे. त्यामुळे नेमके काय झाले हे लोकांना कळले नाही.
अधिक वाचा : नागपुर वर्धा मार्गावर कंटेनर व टिपरची जबर धडक एकाचा जागीच मृत्यू