दिवाळीत एसटी चा प्रवास महागणार, ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीवेळी दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.

गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

एस टी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते.

अधिक वाचा : पोषण माह अभियान : महाराष्ट्राला १४ पुरस्कार

Comments

comments