नागपूर : सिंहासन, जैत रे जैत यासारखे चित्रपट सामान्य रसिकांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. यापुढेही ठरतीलच, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फांऊडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात डॉ. जब्बार पटेल चित्रपटांच्या महोत्सवाचे शनिवारी (ता.8) उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.यादव, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सुभाष आळेकर, समर नखाते, सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, सिंहासन हा राजकीय जीवनावर आधारित चित्रपट, मुक्ता हा समाजकारणबोध चित्रपट रसिकांच्या एक वेगळी छाप टाकतो आहे. चित्रपट, नाटक, माहितीपट यामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव म्हणजे नागपूरकर जनतेसाठी एक वेगळी पर्वणीच आहे, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
8 व 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट आयोजित करण्यात आला असून शनिवारी उद्घाटनानंतर सिंहासन हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यांनतर या चित्रपटामागील पार्श्वभूमी व माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. सायंकाळी 6 वाजता समाजकारणप्रबोधनपर चित्रपट मुक्ता हा चित्रपट दाखविण्यात आला.
प्रारंभी सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्ताविकाद्वारे या चित्रपट महोत्सवाची माहिती सांगितली. उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार दीनानाथ पडोळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
अधिक वाचा : लारवी आढळल्यास फौजदारी कारवाई करा!