नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिर उभारण्यात काहीच रस नाही, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. राम मंदिर उभारण्यात भाजप नाहीतर मोदी खरा अडथळा आहेत.
मोदींनी सत्तेत येण्यापुर्वी राम मंदिर उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्तेत आल्यावर मात्र त्यांना त्याचा विसर पडला आहे, अशी टीका तोगडिया यांनी केली आहे. एससी, एसटी अशा प्रश्नांवर मोदी संसदेत निर्णय घेतात. राम मंदिराचा विषय आल्यावर तो न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगून मोदी यातून काढता पाय घेतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
अधिक वाचा : सरकार बायो फ्यूल को बढावा देने की दिशा में तेजी से काम कर रही है – नितीन गडकरी