सावनेर अंतर्गत नांदीखेडा गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीच्या शोधात पोलिस मध्यप्रदेशकडे रवाना

Nagpur नागपूर

नागपुर : नागपुर जवळील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदीखेडा गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. माहिती नुसार आरोपी राजेश भलावी ३५ हा पीडितेचा दुरचा नातेवाईक असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.

आरोपी भलावी दुपारी पीडित मुलीच्या घरी पाहुना बनून आला होता. पाहुणचार आटोपल्यानंतर तो गावी जाण्याकरिता निघाला. मात्र, परत न जाता आरोपी पीडितेच्या घराशेजारीच लपून बसला. संध्याकाळी पीडिताचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले ती संधी साधुन आणि पीडिता घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत आरोपी घरात शिरला. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपीने १७ वर्षीय मुलीला बळजबरीने गावाजवळच्या शेतात नेले आणि तेथील झुडुपांमध्ये पीडित मुलीवर बलात्कार केला.

या अमानवीय घटनेनंतर आरोपी पीडितेला अंधारात सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस नांदीखेडा गावात दाखल झाले. पीडित मुलीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून तो नराधम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांचे एक पथक आरोपीचे मूळ गाव मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत २४ तासाच्या आत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा : कोराडीतील नवरात्रीच्या जत्रेत एका कर्मचाऱ्याने झाडाला लटकून घेतली फाशी