अल्पवयीन प्रियकराने केली आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबतच लावलं प्रेयसीचं लग्न

Date:

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याआधी या मुलाने आपल्या प्रेयसीला आपण आत्महत्या करत असल्याचं सांगिचलं होतं. यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर प्रेयसीला आपला फोटो देखील पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना बेदम मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. शहरातील कांटापुकूर परिसरात हा मुलगा राहत होता. मृताच्या शेजाऱ्यांनी या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे असं म्हटलं आहे.

मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही तिने याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...