नागपूर : जिल्ह्यातील दराची येथील जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा शिबिर पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून शस्त्रसाठ्यासह स्फोटके जप्त केली आहेत.
धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दराचीच्या जंगलात माओवाद्यांचे शिबिर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘सी-सिक्स्टी’ कमांडो पथकाने सोमवारी सकाळी या भागात अभियान राबवले. जवान त्या भागात पोहोचताच माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.
जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून माओवादी पळून गेले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह आणि स्फोटके जप्त करण्यात आले आहेत. या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याचा अंदाज असून या भागात कोंबिंग ऑपरेशन सुरू होते.
अधिक वाचा : प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या