स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

Date:

नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन पदाची भरती केली जात आहे.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), सेक्रेटेरिएट सिक्योरिटी फोर्स (एसएसएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती केली जात आहे.

तर आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया कम्युटर सीबीई), शारिरीक क्षमता चाचणी (पीईटी), शारिरीक मानक चाचणी (पीएसटी), वैद्यकीय चाचणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी आदींवर आधारीत आहे.

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत आहे. यासाठी ऑनलाईन फी भरण्यासाठी अंतिम तारीख २ सप्टेंबर आहे.

अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...