नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने होणा-या भव्य आयोजनाचा उद्देश हा शहरात योगाचा प्रचार, प्रसार करणे हाच आहे. नागरिकांना योगाचे महत्व पटावे त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतून योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे भव्य आयोजन केले जाते. नागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी व ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारी, स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने सोमवारी (ता.१०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सुभाष जयदेव, स्मिता काळे, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, पतंजली योग समितीचे सर्वश्री प्रदीप काटेकर, शशीकांत जोशी, छाजुराम शर्मा, राजेंद्र जुवारकर, उर्मीला जुवारकर, वि.ब.हि.क. संस्थेचे देवराव सवाईथुल, युनिटी एस.ए.चे संजय निकुले, आय.एन.ओ.च्या किर्तीदा अजमेरा, सुवर्णा मानेकर, श्री. योग साधनाचे डॉ. पी.एम. मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील उज्ज्वला लांडगे, ओमसाई योग ॲकेडमीचे डॉ. गंगाधर कडू, नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे राहुल कानिटकर, प्रशांत राजुरकर, सुनील सिरसीकर, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, हर्टफुलनेस इन्स्टिट्युटचे श्रीकांत अण्णारपा, योगसुत्रा वे ऑफ लाईफ संस्थेच्या सुनीता, मैत्री परिवार संस्थेचे अमन रघुवंशी, अमित योगासन मंडळाचे संदेश खरे, नागपूर जी. योग असोसिएशनचे भुषण टाके, आर्ट ऑफ लिव्हींगचे अतुल बक्षी, नवीन खानोरकर, चंदु गलगलीकर, नेहरू युवा केंद्र संघटनचे एस.एन. साळुंके, ओशोधारा संघ नागपूरचे संजय कटकमवार, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ज्ञानेश्वर गुरव, सहजयोग ध्यान केंद्राचे नंदकिशोर गाणोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी योग दिनाच्या आयोजनासंदर्भात सर्व संस्थांच्या सुचना नवकल्पना मागविल्या व आवश्यक त्या सुचनांवर चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. अनेक संस्थांनी योग दिनाला आपल्या तयारीची माहिती दिली. यावर्षी योग प्रात्याक्षिकामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या नवीन कला, नवीन संकल्पना याबाबत माहिती दिली.
अधिक वाचा : Toyota Kirloskar Motor forays into premium hatchback segment with launch of Toyota Glanza