नागपूर : नागपुरात रविवारी (ता. २३) पार पडलेल्या गणेश विसर्जनादरम्यान गणेशभक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेत काही अडचण तर नाही, ह्याची पाहणी करण्यासाठी महापौर नंदा जिचका यांनी शहरातील विसर्जन स्थळांना भेट देऊन भक्तांशी संवाद साधला.
सोनेगाव तलाव येथे महापौर नंदा जिचकार यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपस्थित होते. येथील कृत्रिम तलावावर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. येथील व्यवस्थेसंदर्भात काही सूचना देत भक्तांशी संवाद साधला. यानंतर महापौरांनी अंबाझरी तलाव, फुटाळा तलावाला भेट दिली. याठिकाणी मनपातील सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे होत्या. महापौर नंदा जिचकार यांनी येथे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत व्यवस्थेसंदर्भात विचारपूस केली. तेथून त्यांनी गांधीसागर तलावाला भेट दिली. येथील व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी केली. याठिकाणी नगरसेवक प्रमोद चिखले उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सक्करदरा तलावाला भेट दिली. येथे आमदार सुधाकर कोहळे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन या भेटीत महापौर नंदा जिचकार यांनी भक्तांना केले.
गणपती विसर्जन स्थळांना महापौरांची भेट; भक्तांशी साधला संवाद
Date: