भारतात पॉनोग्राफी (Pornography) बाबतचे नियम अतिशय कठोर आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra)याला पॉनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. पॉर्न फिल्म बनवणं आणि त्या प्रसिद्ध करणं या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. तरुणांमध्ये पॉर्न फिल्म (Porn Film) पाहण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं किंवा अविवाहितांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु एका अभ्यासातून मात्र वेगळाच खुलासा झाला आहे. विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचं अभ्यासातून, सर्व्हेतून समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नानंतर स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्यामागच्या कारणांबाबतही खुलासा झाला आहे.
यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजी (European Federation of Sexology) यांनी केलेल्या एका अभ्यासातून विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचा हा खुलासा झाला आहे. त्याउलट लग्नानंतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही या अभ्यासात समोर आलं आहे.
या अभ्यासादरम्यान युरोपातील काही विवाहित जोडप्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जोडप्यांना त्यांच्या सेक्स लाईफ (Sex Life), पॉर्न पाहणं, सेक्शुअल लाईफमधील बदलांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये 9 टक्के महिलांनी लग्नाआधी पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के महिलांनी लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं.
पुरुषांमध्ये हे प्रमाण अगदी उलट असल्याचं सर्व्हेतून समोर आलं. लग्नाआधी 23 टक्के पुरुष, तर लग्नानंतर 14 टक्के पुरुष पॉर्न पाहत असल्याचं म्हटलं.
स्त्रिया लग्नानंतर ताण कमी करण्यासाठी पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. तसंच सेक्स लाईफ फँटसीची इच्छा हेदेखील 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं कारण आहे. लग्नानंतर पुरुष आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांचं सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. परिणामी पार्टनरकडेही दुर्लक्ष होतं. त्यामुळेच अधिकतर स्त्रिया लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचंही समोर आलं आहे.