जळगाव जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात !

Date:

जळगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या एक लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी एक लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयांत दहा हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात दोन हजार १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोचले आहे. मृत्युदर १.७७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णशोध मोहिमेंतर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांच्यावर वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत आठ लाख ५२ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांपैकी एक लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सात लाख ३६ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले असून, सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात सहा हजार ३२५ व्यक्ती होमक्वारंटाइन असून, ६७० व्यक्ती विलगीकरण कक्षात आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी सात हजार ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले, तर तीन हजार ३९९ रुग्ण लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले–एकूण मृत्यू—-बरे होऊन घरी गेलेले
जळगाव शहर- २,१९८—४७९–२६,३५८
जळगाव ग्रामीण- ३९१–१०९–३,९६२
भुसावळ- १,२३६–२७६–८,४४४
अमळनेर- ४९५–१२८–६,९५५
चोपडा- ८७७—१४७–११,५७७
पाचोरा- ४४०—९८–३,१४६
भडगाव- १८८—५६–२,९२८
धरणगाव- ४४७—९४–४,१५४
यावल- ४७१–१०३–३,१६९
एरंडोल- ६२७–७७–४,६३१
जामनेर ८५७—१०६–६,३१९
रावेर- ९२०—१३२–३,५२८
पारोळा- ३०६–३४—३,७३६
चाळीसगाव- ४३२—१०१–६,३११
मुक्ताईनगर- ६३७–४९–३,०३०
बोदवड ३०३—२७–१,७४३
इतर जिल्ह्यांतील-१०५–०–७६७

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...