‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा’; कापडाचा मास्क व्हायरसपासून संरक्षण देत नाही!

Date:

कोरोना माहामारीच्या काळात पोलिसांकडून वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी प्रशासनानं चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाकाळात संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. आता मास्कच्या वापराबाबत मुंबई महापालिकेकडून लोकांना ‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा.’ असा संदेश देण्यात आला आहे.

तुम्ही कापडाचा मास्क वापरत आहात का? असा प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यानंतर जर तुम्ही कापडाचा मास्क वापरत असाल तर त्याच्या आत सर्जिकल मास्क असायला हवा. तरच व्हायरसपासून संरक्षण मिळू शकेल, असा संदेश देण्यात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी डबल मास्क लावण्यास ते जास्त सुरक्षित राहतील. यासाठीच मुंबईकरांना कॉटन मास्क लावण्याआधी सर्जिकल मास्क लावण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

याशिवाय कोणता मास्क वापरल्यानं कितपत संरक्षण मिळतं हे सुद्धा सांगितले आहे. यानुसार सर्जिकल मास्क आणि एन-९५ मास्क वारल्यानं कोरोना व्हायरसपासून ९५ टक्के संरक्षण मिळतं. तर कापडाचा मास्क वारल्यानं ० टक्के संरक्षण मिळत असल्याचा दावा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related