व्हिडिओ : मराठी चित्रपट ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबर ला पुन्हा प्रदर्शित

Date:

नागपूर : असं म्हणतात कि, माणूस जन्माला येण्या आधीपासून त्यांचा संघर्ष सुरु झालेला असतो. संघर्ष हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. या संघर्षात जो जिद्ध दाखवतो, धीराने उभा राहतो. आणि स्वतःला घडवतो तोच नवा इतिहास घडवू शकतो. ‘पाटील’ चित्रपटाच्या रूपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेषक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. ली , साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा. लि . निर्मित  ‘पाटील  संघर्ष… प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा संघर्षमय प्रवास मांडला आहे.

प्रेम आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोनी बाजू आहेत. त्या दोन्ही गोष्टीचा समतोल साधता आला कि माणूस सुखी होतो. कर्तव्य आणि प्रेम या दोन्ही गोष्टीची सांगड घालत शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, संघर्ष आणि त्यांनी पचवलेले  दुःख ,अपमान आणि त्यानंतर हि परिस्तिथी समोर हार न मानता तिला धीराने उत्तर देण्याची त्यांची जिद्ध समोर येणार आहे. प्रेम कर्तव्य यांच्यात समतोल साधून पाहणाऱ्या शिवाजीने हाती घेतलेले ध्येय तो पूर्णत्वास नेईल का? या प्रश्नच उत्तर मिळवण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा.

संतोष राममीना मिजगर लिखित-दिगदशिर्त, पाटील चित्रपटात एस. आर. एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त) आणि पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एक्सेल व्हिजन चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.

‘पाटील’ चित्रपटात ऐकून पाच गाणी आहेत. ‘आनंद शिंदे, बिष्णु मोहन, बेला शेंडे, सुखविंदर सिंग, रहा विवेक, गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल, यांनी चित्रपटालीत गाणी स्वरबद्ध केली आहे. तर गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम.यांनी या चित्रपटातील गीत लिहली आहेत. संगीत दिग्दर्शन आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी केले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवुड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेन्ट या चित्रपटाचे प्रस्तुत करते आहेत. जयशील मिजगर, तेजस शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकृते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल, दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंडे, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी येकटी, राजा यांचे आहे. नुत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे.

अधिक वाचा : ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...