नागपुर :- राज्यामध्ये मराठा आंदोलन तीव्र होत असतांना नागपुर मध्ये मंगळवारी मराठा समाज संतप्त झाला त्यानंतर स्थानिक मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंद सोबत नागपुर बंद ची हाक दिली. नागपुरात बंदाचा समिश्र प्रतिसाद पहायला मिळाला शहराचा सक्रदारा परिसरात सकाळी काही दुकाने बंद करण्यात आली तर महल गाँधी गेट परिसरातील शिवाजी पुतळ्या समोर धरने प्रदर्शन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा संघटनांनी केलि आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गंगापूर तालुक्यात कायगाव टोक इथे एका तरुणाने जलसमाधी घेऊन आरक्षणविरोधी लढ्यात स्वतःची आहुती दिली. या घटनेनंतर त्याचे पडसाद सम्पूर्ण महाराष्ट्रतात पहायला मिळत आहे.
माहिती नुसार मुंबईत मात्र बंद पाळला जाणार नाही. आषाढी एकादशीनंतर वारकरी मुंबईत परतणार असल्याने मुंबईत बंद ठेवणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसह नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, सोलापूर, सातारा येथे बंद पाळण्यात येणार नाही. परंतू याबाबत महाराष्ट्र बंदची पुढील भुमिका ठरवण्यासाठी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे दुपारी २ वाजता बैठक घेऊन ठरवण्यात येईल. वारकऱ्यांच्या गैरसोय होणार नाही यादृष्टीने ही भूमिका घेण्यात आली आहे.
अधिक वाचा : नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाला जर्मनीचे सहकार्य