जून महिन्यात प्रदर्शित होणार Manoj Bajpayee ची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’

Date:

अभिनेता Manoj Bajpayee ची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’ २०१९ मध्ये रिलीज झाली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या वेब सीरिजला प्रेक्षकांचं तुफान प्रेम मिळालं. त्यानंतर मागच्या बऱ्याच काळापासून या वेब सीरिज्याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक मागच्या बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत आहेत. हा सीझन खरं तर फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार होता पण ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वादांमुळे या वेब सीरिजची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही वेब सीरिज आता जूनमध्ये रिलीज होणार आहे.

वेब सीरिजचे निर्माते राद निधिमोरु आणि कृष्णा डीके यांनी ही वेब सीरिज कधी रिलीज होणार याची घोषणा केली. निर्मात्यांनी याबाबत एक स्टेटमेंट दिलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, ‘आम्हाला माहीत आहे की, तुम्ही ‘द फॅमिली मॅन २’ च्या दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहात. या वेब सीरिजला तुम्ही जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही आभारी आोहत. पण तुमच्यासाठी आमच्याकडे नवे अपडेट आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.’

पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार ‘द फॅमिली मॅन २’ जून महिन्यात रिलीज होणार आहे. वेब सीरिजचे मेकर्स लवकरच फायनल रिलीज डेटची घोषणा करतील. ‘द फॅमिली मॅन २’मध्ये Manoj Bajpayee अभिनेत्री समंथा अक्कीनेनीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती ‘राजी’ नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

दरम्यान जानेवरीमध्ये ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद दिला होता. यावेळी प्रेक्षकांना वेब सीरिजचा खलनायक जिवंत आहे की नाही याबाबत खूप उत्सुकता आहे. ही भूमिका अभिनेता नीरज माधवने साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याचं बरंच कौतुकही झालं होतं.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related