व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं; भरचौकात 15 ते 20 जणांनी तलवारीने भोसकून केली एकाची निर्घृण हत्या

Date:

औरंगाबाद – सोशल मीडियावरील भांडणातून होणाऱ्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका मित्राने इतरांची कुत्र्याशी तुलना केल्याने सुमारे १५ ते २० जणांनी मित्राची तलवार, चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून त्यांची भर चौकात निर्घृण हत्या केली.

मोईन महमूद पठाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करायचा. रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास हर्सूल येथील फातेमानगर चौकात घडली. या हल्ल्यात मोईनचा भाचा इरफान शेख रहीम शेख (वय, २४) गंभीर जखमी झाला असून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन पठाण हे हर्सूल येथे प्लॉट, जमीन खरेदी- विक्री व्यवहारात एजंट म्हणून काम करायचे. गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेखलाल रसूल पटेल, रफीक रसूल पटेल, शोएब सलीम पटेल आणि इतर काही लोकांचा त्यांना विरोध होता. मोईन पठाण यांनी मित्रांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुत्र्याची उपमा दिल्याने त्यांच्या मित्रांना प्रचंड राग आला. या रागाच्या भरात त्यांनी मोईन यांचा खून केला.

अधिक वाचा : महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related