16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप

Date:

हरारे: कुणाला एकच मूल हवं असतं, कुणी हम दो हमारे दो असं ठरवलेलं असतं. कुणी तर आपल्याला क्रिकेट टीमच काढायची आहे, असं मिश्कीलपणे म्हणतंही. यापेक्षा फार फार तर एखाद्या व्यक्तीला किती मूलं हवी असण्याची इच्छा असू शकते? 20, 30, 40, 50… आकडा वाचूनच तुम्हाला गरगरायला लागलं ना?. पण एका व्यक्तीने तर त्याला 1000 मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. काय, आता तर धक्काच बसला ना तुम्हाला?

आफ्रिकेतील झिम्बाब्वेमध्ये राहणारे 66 वर्षांचे मिशेक न्यानदोरो. त्याच्या 16 बायका आहेत आणि 150 मुलं आहेत. पण इतक्यावर ते समाधानी नाहीत. आता तर त्यांनी सतराव्या लग्नाची तयारी केली आहे. आपल्याला एकूण 100 पत्नी आणि 1000 मुलं हवीत, अशी विचित्र इच्छा या त्यांनी ठेवली आहे.

मिशेक मशोनालँड सेंटर प्रांतातील बायर जिल्ह्यात ते राहतात. ते दुसरं काहीच काम करत नाही. आपल्या पत्नींना समाधानी ठेवणं हाच आपल्या जॉब असल्याचं ते सांगतात. त्यांच्या पत्नी वय झाल्यानंतर त्यांच्याशी नीट लैंगिक संबंध ठेवू शकत नाही, त्यामुळे ते तरुण महिलांशी लग्न करावं लागतं. त्यासाठी त्यांनी शेड्युलही तयार केलं आहे. प्रत्येक रात्री ते चार पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवतात.

मिशेकनं सांगितलं, माझ्याकडे कोणताच जॉब नाही. पत्नींना आनंदी ठेवणं हेच माझं काम आहे. 150 मुलांमुळे माझ्यावर कोणताही ताण नाही उलट मला याचा फायदाच झाला आहे. कारण मला माझ्या मुलांकडून गिफ्ट्स मिळत राहतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो तरी कसा. तर हे कुटुंबं शेती करतं. या मिशेक यांची सहा मुलं झिम्बाब्वेच्या नॅशनल आर्मीत काम करतात. दोन मुलं पोलिसात आहे आणि 11 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या 13 मुलींची लग्नही झाली आहेत.

2015 साली त्यांनी शेवटचं सोळावं लग्न केलं होतं. त्यानंतर देशातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी आपल्या लग्नात ब्रेक घेतला. आता 2021 मध्ये सतराव्या लग्नाची प्लॅनिंग करत आहे. मृत्यूआधी त्यांना एक हजार मुलं जन्माला घालायची आहेत.

मिशेक हे फक्त आपल्या लैंगिक समाधानासाठीच नव्हे तर देशसेवा म्हणून करत असल्याचं ते सांगतात. मिशेक हे झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. 1964 ते 1979 पर्यंतच्या रोडेशियन बुश वॉरचा ते भाग होते. 1983 मध्ये त्यांनी आपला प्रोजेक्ट सुरू केला. या लढाईत जी जीवित आणि वित्तहानी झाली, त्यासाठी मिशेक यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या देशाचं लोकसंख्या वाढवण्यात ते मदत करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related