..तरच मुलीच्या नावे होणार 50 हजार रुपये; जाणून घ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबद्दल नवीन नियम

Date:

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी लागू केली होती. परंतु, आता या योजनेत नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे. मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल. कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50,000 रुपये किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्मानंतर आणि नसबंदीनंतर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा होणार आहेत. मात्र, या योजनेत आता काहीअंशी बदल करण्यात आलेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2014 अन्वये ‘सुकन्या’ योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञेय आहेत. तसेच केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे. (यात परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो.) मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या, तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ‘सुकन्या’ योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.

योजनेचा उद्देश : ‘सुकन्या’ योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘सुकन्या’ योजनेच्या सर्व अटी व शर्ती ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेमध्ये लागू करण्यात आले.

  1. लिंग निवडीस प्रतिबंध करणे
  2. बालिकेचा जन्मदर वाढविणे
  3. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
  4. बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
  5. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे असे या योजनेचे उद्देश आहेत.

‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.

  1. एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
  2. दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या प्रमुख अटी :

  • मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक
  • कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
  • कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी 1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक
  • कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक
  • एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
  • सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
  • ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप : सुरुवातीला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते (Joint Account) उघडण्यात येईल. यामध्ये ५००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.

  • शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. 50,000 मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. 25000)
  • जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी 6 वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी 12 वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
  • या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
  • दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • बँक खात्याचे पासबुक
  • उत्पन्नाचा दाखल
  • रहिवासी दाखल
  • मुलीचा जन्मदाखला
  • पासपोर्ट साइज फोटो

अर्ज करण्याची पध्दत : सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

योजनेची अधिक माहिती ‘येथे’ उपलब्ध : या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

महत्वाचे : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे

  • ही योजना सुरू झाल्याने मुलींच्या संख्येत वाढ होणार आहे.
  • प्राप्त झालेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
  • उत्पन्नाची मर्यादा अधिक ठेवण्यात आली आहे, जेणेकरून अधिक कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • जर आपल्याला मुलगी जन्माच्या 6 महिन्यांत (1 वर्षाच्या आत) किंवा दोन मुलींचे कौटुंबिक नियोजन केले, तर लोकसंख्या नियंत्रणात वाढ होईल, तरच हा लाभ देण्यात येईल.
  • आई व मुलीच्या नावे खाते उघडले जाईल.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ योजना’ला चालना देईल.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Cloud Migration With Amazon Web Services: AWS Migration Services

Cloud migration refers to the process of relocating digital...

AWS Server Migration Service – Uses and Benefits

What is AWS Server Migration Service (SMS)? AWS server migration...

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...