नागपूर : घरकाम करणाऱ्या तरुणीवर चोरी आणि पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत मालकीण मंदा डंबारे आणि त्यांच्या मुलीने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात मंदा डंबारे आणि तिच्या मुलीविरुद्ध पीडितेने गुन्हा दाखल केला आहे.
मालकीण मंदा डंबारे आणि त्यांच्या मुलीने पीडितेला घरातून ओढत रस्त्यावर आणले व भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, रस्त्यावरील एकाही व्यक्तीने तरुणीला त्या मायलेकींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. पीडिता ही गरीब कुटुंबातील आहे. ती आरोप नाकारुन मायलेकींसमोर हातपाय जोडत होती. मात्र, आरोपी मायलेकींनी तिचे केस धरुन तिला रस्त्यावर खेचत आणले.
तरुणीला निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लताच्या तक्रारीवरुन जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी मंदा डंबारे आणि तिच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरीपटका ठाण्यातील या प्रकारची ही तिसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे.
अधिक वाचा : नागपूर : फेसबुक फ्रेंडशिप भोवली; तरुणीवर फेसबुक फ्रेंड्सने केला बलात्कार