नागपूर : फेसबुक फ्रेंडशिप भोवली; तरुणीवर फेसबुक फ्रेंड्‌सने केला बलात्कार

नागपूर

नागपूर : फेसबुकवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर फेसबुक फ्रेंड्‌सने बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (20, रा. श्रमजीवीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित 20 वर्षीय तरुणी आयटीआय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. तर आरोपीही शिक्षण घेत असून, मैत्रिणीमार्फत तिची आरोपीशी ओळख झाली होती. 2016 मध्ये त्याने फेसबुकवर तिला फ्रेन्ड रिक्‍वेस्ट पाठवली. फेसबुकवरून ते एकमेकांशी बोलू लागले. जानेवारी 2017 पासून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर तिने त्याला लग्नाची मागणी घातली. त्याने होकार दिला. त्यानंतर पुढच्या वर्षी लग्न करू, असे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. स्वतःच्या घरी वेळोवेळी तिला जबरदस्तीने बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो तिच्या घरी येऊन बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करीत होता. बदनामीपोटी तरुणीने आतापर्यंत हा सर्व प्रकार सहन केला. मात्र, आरोपी अनिकेतच्या मागण्या वाढत असल्याने तिने अजनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक झाली नसून, त्याचा शोध सुरू आहे.

अधिक वाचा : नागपुरात सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांचा छापा