महाराष्ट्र लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद? वाचा संपूर्ण नियमावली

Date:

महाराष्ट्र लॉकडाऊन कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात शुक्रवार ते रविवार पूर्ण लॉकडाऊन आणि सोमवार ते शुक्रवार अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत या नव्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सदर निर्बंध लावतांना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात येणार असल्याचं राज्य शासनाने म्हटलं आहे.

आगामी काळात लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात येईल. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुचवण्यात आला आहे, तर उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नागरिकांनी बंधनं पाळली नाहीत, तर प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात येईल, असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

नागरिकांनी या निर्बंधांचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 लॉकडाऊन महाराष्ट्र राज्यात काय सुरू काय बंद?

शेतीविषयक कामे सुरु

  • शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

  • राज्यात 144 कलम लागू केले जाईल.
  • सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
  • रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
  • यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
  • बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
  • दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत, असं निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकतं.

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु राहतील

  • किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहणार

  • सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील.
  • रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
  • सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
  • बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे.
  • बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

  • खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.
  • केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन,
  • वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

 लॉकडाऊन महाराष्ट्र शासकीय कार्यालये- 50 टक्के उपस्थितीत

  • शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील.
  • शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल.
  • आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल.
  • कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात.
  • केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

मनोरंजन, सलून्स बंद

  • मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील.
  • चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

प्रार्थना स्थळे बंद

  • सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील.
  • मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
    या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

  • उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील.
  • पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही.
  • टेक-अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
  • खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
  • रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.
  • पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल.
    नियमांचे पालन होत नसल्याचं दिसल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करेल.

ई-कॉमर्स सेवा सुरू

  • ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.
  • होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे.
  • अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधित दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
  • सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
  • याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं.

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू

  • वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल.
  • पण विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालये बंद

  • शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 वी आणि 12 वी परीक्षांचा त्यांना अपवाद असेल.
    याशिवाय, सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

  • उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.
  • चित्रपटांचं चित्रीकरण सुरू ठेवता येईल, पण जास्त गर्दी करता येणार नाही.
  • सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
  • 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.

 लॉकडाऊन महाराष्ट्र आजारी कामगाराला काढता येणार नाही

  • बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे.
  • केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
  • कोणत्याही कामगारास कोव्हिडची लागण झाली यामुळे त्याला काढून टाकता येणार नाही.
  • संबंधित कर्मचाऱ्याला आजारी रजा द्यावी लागेल. तसंच त्यादरम्यान त्याला पूर्ण पगार देणं बंधनकारक आहे.
  • कामगारांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असेल.

…तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

  • 5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल.
  • त्या सोसायटींच्या बाहेर तसा फलक लावण्यात येईल.
  • संबंधित सोसायटींमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असेल.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...

Ram Navami 2025: The Significance, Rituals, and Celebrations of Lord Rama’s Birth

 Ram Navmi 2025 Significance: Ram Navmi marks the birth anniversary...