मुंबई: करोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे हे रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतरही काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
३ मेनंतर मुंबई, ठाणे, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार: उद्धव ठाकरे
Date: