नागपूर : मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्ये :
> ११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन
> मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पूर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर
> पत्रकार सन्मान योजनेत वाढ. आता ही रक्कम २५ कोटींवर
> छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी मंजूर
> ओबीसी समाजासाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणार
> राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
> कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी १०० कोटी उपलब्ध करणार
> अर्थसंकल्प सुरू असताना विरोधकांचा सभात्याग
> अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात ओबीसी मुद्द्यावरून खडाजंगी
> लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद
> ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
> मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता
> अर्थसंकल्पः २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर
> मृद व जलसंधारण विभागाकरीता ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजारांची तरतूद
> २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागासाठी १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजारांची तरतूद
> सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद
> साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
> बळीराजा जलसंजीवनी योजनेकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद
> गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन
> राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ
> काजू उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
> चार कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद
> कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद
> जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद
> जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा
> शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न
> गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी खर्च
> शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावण्याची निर्मिती केली
> पिण्याच्या पाण्यासाठी राज्यात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
> राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला
> दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५६३ कोटी रुपये मिळाल्याची अर्थमंत्र्यांची माहिती
> राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची अर्थमंत्र्यांकडून माहिती
> अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू
> शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विधानसभेच्या गॅलरीत उपस्थित
अधिक वाचा : आईएमए की हड़ताल से लड़खड़ाई स्वास्थ्य व्यवस्था, भटकते रहे मरीज