पत्नीने पतीला रंगे हात पकडले, दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये होता बंद,आणि मग…

पत्नीने पतीला रंगे हात पकडले, दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये होता बंद,आणि मग...

पती पत्नीच्या भांडणाच्या अनेक घटना रोज देशात घडत असतात. त्यातील काही भांडणाच्या व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने आपल्या पतीची धुलाई केली आहे. या सगळ्या प्रकाराला तेथे उभे असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये रंगेहात पकडल्यानंतर पत्नीने आपल्या पतीला लाकडाच्या तुकड्याने जबर मारहाण केली. पोलिसांनी दखल घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. ही घटना मध्य प्रदेशमधील आगर मालवा जिल्ह्यातील आहे.

तर झाले असे होते की नागद जंक्शनच्या बाहेर असलेल्या एका घराच्या बाहेर खुप मोठी गर्दी जमली होती कारण एक पत्नी आपल्या पतीला मारहाण करत होती. तिने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले होते.

तेथे अनेक पत्रकार आणि पोलिसही जमा झाले होते. पत्नीने आपल्या साथिदारांसोबत त्या घराचा दरवाजा वाजवला. थोड्या वेळाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. आतमध्ये त्या महिलेचा पती आणि आणखी एक महिला होती.

पती बाहेर येताच पत्नीला राग अनावर झाला आणि तिने एका दांडक्याने पत्नीची धुलाई केली. पती-पत्नीच्या त्या भांडणाला सगळ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केले. जशी ती महिला बाहेर आली पत्नीने त्या महिलेलाही मारहाण करण्यास सुरूवात केली.

पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार चालू होता. पोलिसांनी सगळ्यांना गाडीत टाकले आणि त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना समजवण्यात आले आणि सोडून देण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी उभे असलेल्या लोकांनी मात्र या घटनेचा पुर्ण आनंद घेतला आणि ही पुर्ण घटना आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली.