गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो ,जाणून घ्या ऑफर

Date:

गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. किंमत जास्त असूनही आपल्याला सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. परंतु, जर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर खरेदी करायचा असेल तर एक जबरदस्त ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या सिलिंडरची किंमत ७६९ रुपये आहे. ही ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर.

एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार ७०० रुपयांचा कॅशबॅक
ही ऑफर Paytm वर मिळत आहे. युजर्संना यासाठी एलजीपी सिलिंडर पेटीएमवरून बुक करावे लागेल.
सर्वात आधी Paytm वर जा. फोनमध्ये अॅप नसेल तर अॅप डाउनलोड करा.
यानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. यानंतर Book a Cylinder वर टॅप करा.
आता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला १७ डिजिटचा एलपीजी आयडी टाका.

पुन्ही गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. यानंतर प्रोसिडवर टॅप करा.

या ठिकाणी तुमची डिटेल्स दिसेल. खाली ७६९ रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे. एक स्क्रॅचकार्डसाठी.
या पेजवर देण्यात आलेले Proceed to Book Cylinder वर टॅप करावे लागेल.
यानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिले जातील. या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल.

यावर टॅप करा. खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा. ही ऑफर अप्लाय होईल.
यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.
सध्या तुम्हाला ७६९ रुपयांचे पेमेंट करावे लागेल. परंतु, कॅशबॅकमध्ये तुम्हाला काही रक्कम परत मिळून जाईल. जर युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक परत मिळत असेल तर त्यांना गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत मिळेल.

नोटः ७०० रुपयांचा कॅशबॅक पेमेंट एका युजरला केवळ एकदाच मिळेल. तसेच ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपनीसोबत करार केला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...

Dominate the Digital Space: Unveiling the Top Facebook Ads Agency in India

Are you a business owner in India looking to...