कावासाकी निन्जाच्या धडकेत एक ठार

नागपूर : कोराडी भागात भरधाव कावासाकी निन्जा या मोटरसायकलच्या (एमएच-४०-बीयू-६१११) धडकेत मंगेश एकनाथराव सिंगने (३९, रा. म्हाळगीनगर) हे ठार तर मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

आकाश नरेश पारधी (वय १८, रा. तिवडा, गोंदिया) व त्याचा मित्र सौरभ नरेश अंबादे (१९) अशी जखमींची नावे आहेत. मंगेश हे एमएच-४९-डी-६५६८ या क्रमांकाच्या वाहनावर डीजे घेऊन जात होते. कोराडी भागात पोलिसांची नाकेबंदी सुरू होती. मंगेश यांनी वाहन थांबविले. पोलिसांजवळ गेले. याचदरम्यान सावनेरकडून भरधाव येणाऱ्या मोटरसायकने मंगेश यांना धडक दिली. जखमी होऊन मंगेश यांचा मृत्यू झाला तर मोटरसायकल स्लिप झाल्याने सौरभ व आकाश जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी मोटरसायकलचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : मंगळ यानानंतर इस्रो करणार बुध ग्रहाची वारी