रावण दहनाला येणारा खर्च वाढला, तरीही होणार रावण दहन : कस्तूरचंद पार्क वर रंगणार सोहळा

Date:

नागपुर : नागपुर मध्ये रावण दहन करण्याची परम्परा मागील ७० वर्ष्यापासून शुरू आहे.शहरातील कस्तूरचंद पार्क, रेशीमबाग, चिटणीस पार्क, चुनाभट्टी येथील रावणदहन प्रसिद्ध आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या सोहळ्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या, महागाई आणि रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंवरील जीएसटी यामुळे यावर्षी ऑर्डर कमी झाली आहे. कडबी चौकात तीन पिढ्यांपासून रावणाचे पुतळे बनविणाऱ्या बिनवार कुटुंबीयांनी या घटलेल्या ऑर्डरवर प्रकाश टाकला. खेमकरसिंग बिनवार यांनी सांगितले की, ‘पुतळा बनविण्यासाठी प्रामुख्याने आर्ट पेपर, ज्युट, गोंद, रंग, धागा यांचा वापर करण्यात येतो. या सर्वांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. परिणामत: या वस्तूंच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रावणदहनाला येणारा खर्च वाढला असून काही लहान मंडळांनी ऑर्डर देण्यास नकार दिला आहे. बिनवार यांनी बनविलेले पुतळे शहरातील विविध भागांशिवाय वर्धा, सावनेर, काटोल, कोंढाळी, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे निर्यात होतात. चाळीस फूट ते साठ फूट आकाराच्या पुतळ्यांमध्ये रावण, कुंभकर्ण व मेघनाद यांचा समावेश असतो.
कस्तूरचंद पार्क वर रंगणार सोहळा
रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रामकथेवर सादर केलेले नाट्य, फटाक्यांची आतषबाजी, नयनरम्य लेझर शो अशा थाटात हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणदहनाचा कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेद्वारे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. तेथे सायंकाळी होणारा रावणदहनाचा उत्सव शहरासाठी आकर्षण असतो. हा उत्सव बघण्यासाठी घरातील बच्चेकंपनीपासून ज्येष्ठ नागरिक सर्वच येतात. या उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत रामकथेतील विविध प्रसंगांना आकर्षक रोशनाईमध्ये उलगडून दाखविले जाते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related