Karnataka Liquor : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री

Date:

बंगळुरु : लॉकडाउनमुळे बंद असलेली दारुची दुकानं (Karnataka Liquor Sale ) आज तब्बल दीड महिन्यांनी उघडली. त्यामुळे तळीरामांमध्ये भलताच उत्साह आज पाहायला मिळाला. सकाळपासूनच दारुच्या दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. कर्नाटकात तर तळीरामांनी दारु खरेदीचा नवा विक्रम केल्याचं चित्र आहे. कर्नाटकात आज एका दिवसात दारुची विक्रमी विक्री झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 45 कोटींची मद्यविक्री कर्नाटकात झाली, अशी माहिती उत्पादन शुल्क (Karnataka Liquor Sale ) विभागाने दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशात लॉकडाऊन आहे. आजपासून या लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. त्यासोबतच सरकारने आजपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व झोनमधील दारु दुकानं उघडण्यास सशर्त परवागनी देण्यात आली. त्यामुळे आज देशातील दारु दुकानं उघडण्याच्या आधीच दुकानांबाहेर लोकांच्या रांगा दिसून आल्या.

कर्नाटकातही दारुची दुकानं उघडण्यापूर्वी तळीरामांनी दुकानांबाहेर नंबर लावून ठेवल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फटाके फोडून दुकाने उघडण्यात आली, तर काहींनी पहिल्या ग्राहकाच्या गळ्यात हार घालून त्याचं (Karnataka Liquor Sale ) स्वागत केलं. तब्बल दीड महिन्यांनी दारुची दुकानं उघडल्याने कर्नाटकात तळीरामांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे एका दिवसात 45 कोटी रुपयांची दारु विक्री झाली. यामध्ये 3.9 लाख लिटर बिअरची विक्री झाली आहे, तर 8.5 लाख लिटर देशी दारुची विक्री झाली आहे. फक्त 10 तासात 45 कोटी रुपयांची दारु विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली.

आजपासून कुठे काय सुरु राहणार?

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी नवी नियमावली जारी केली. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले.

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.

– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.

या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोन आणि रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता दारुची दुकानं उघडी ठेवता येणार आहेत.

Also Read- दुकाने, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांना अटींच्या अधीन राहून परवानगी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...